Next

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, गोपीचंद पडळकर विश्वास नांगरे पाटलांना घाबरून माझ्याकडे आले | ST Bus Strike

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 02:24 PM2021-11-26T14:24:12+5:302021-11-26T14:25:59+5:30

विश्वास नांगरे पाटील यांना घाबरून आमदार गोपीचंद पडळकर हे माझ्याकडे आले, असं आंदोलक कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय... राज्य सरकारनं ST कर्मचाऱ्यांना दिलेली वेतनवाढ आणि इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेतलं.. तशी घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली... त्यानंतर, आमदार खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेतल्याचं जाहीर केलं.. आणि आझाद मैदान सोडलं... त्यानंतर, आंदोलक कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांचं नेतृत्व करताना पडळकर आणि खोत यांच्यावर टीका केली...