मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचं घर जप्त | CM Uddhav Thackeray | Ajoy Mehta
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 21:09 IST2021-11-02T21:09:13+5:302021-11-02T21:09:43+5:30
अजॉय मेहता... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार... महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव... मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त... अजॉय मेहता हे सध्या अडचणीत सापडलेत... कारण त्यांचं घर हे थेट इनकम टॅक्स विभागाने जप्त केलंय... अजॉय मेहता यांच्या नरिमन पॉईंट इथल्या घरावर इन्कमक टॅक्स विभागाने ही कारवाई केलेय... केंद्रीय यंत्रणांकडून राज्य सराकारशी संबधित व्यक्तींवर कारवाईचा धडाका लागलेला असताना, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्लागारांवर झालेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरलेय... अजॉय मेहता यांच्या ज्या घरावर जप्ती आणण्यात आलेय, ते प्रकरणही चक्रावणारं आहे... हा प्रकार नेमका काय आहे, हे सविस्तर पाहूयात...