२०२४ आधी सरकार आलं तर बोनसच...असं फडणवीसांनी म्हणणं म्हणजे माघार ? Devendra Fadnavis | BJP in 2024
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 03:15 PM2021-11-18T15:15:16+5:302021-11-18T15:15:32+5:30
देवेंद्र फडणवीस म्हणतायत की २०२४ आधी राज्यात आपलं सरकार आलं तर बोनस समजू...आता फडणवीसांचं हे विधान खूप काही सांगून जातंय. एकीकडे नारायण राणे असोत, चंद्रकांत पाटील असोत की सुधीर मुनगंटीवार.. सरकार पडण्याच्या नवनवीन तारखा भाजपचे नेते देत असतात. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार २ महिन्यात पडेल, तीन महिन्यात पडेल, ६ महिन्यात पडेल अशी भाकितं भाजपचे नेते वर्तवत असतात. खुद्द फडणवीसांनीही महाविकास आघाडी सरकार पडण्यावरुन अनेकदा टीका केली होती. १५ ऑक्टोबरला फडणवीस म्हणाले होते की...