महाराष्ट्र सदन पिच्छा सोडेनात, भुजबळ पुन्हा मंत्रीपद गमवावं लागणार? Maharashtra Sadan Scam
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:42 PM2022-01-14T14:42:55+5:302022-01-14T14:43:21+5:30
Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांवर तुफान आरोप झाले होते, त्यांचं राजकीय करिअरच धोक्यात आलं होतं. खरं तर काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. पण आता पुन्हा एकदा याच प्रकरणामुळे भुजबळ अडचणीत सापडलेत. त्याचं झालंय असं की महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही याचिका दाखल केलीय. नेमकं काय होतं हे प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळांना निर्दोष मुक्त करुन तर किती महिने लोटले मग आताच अंजली दमानियांनी याचिका का दाखल केली, भुजबळांना पुन्हा आपलं मंत्रीपद गमवावं लागू शकतं का यावरच बोलूयात पण सगळ्यात आधी या घोटाळ्याची क्रोनोलॉजी पाहुयात...