Next

कमी प्रमाणात दारु घेतली तर औषध असते, साध्वींचा नवा शोध...पाहा काय म्हणाल्या? Pragya Singh Thakur

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:55 PM2022-01-21T18:55:41+5:302022-01-21T18:56:00+5:30

भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर काय म्हणतेय ते. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी, नथुराम गोडसेचं उघड समर्थन करणारी साध्वी आता दारुबद्दल ज्ञान पाजळतेय. दारु कमी प्रमाणात प्यायली तर ती औषध असते असं ज्ञान भगवी वस्त्र घालणारी साध्वी देतेय. खरं तर भोपाळमध्ये दारुबंदीवरुन तिला प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा साध्वीनं दारुबंदीचं समर्थन केलं पण त्याचवेळेला आयुर्वेदात दारु वापरली जाते, ती कमी प्रमाणात प्यायली तर औषध असते जास्त प्यायली तर विष होते असं साध्वी म्हणाली. साध्वी नेमकं काय म्हणालीय पुन्हा ऐका...