Next

योगी-राहुल गांधींसमोर आदित्य ठाकरे, राज्याबाहेर सेना आधीचे रेकॉर्ड मोडणार? Sanjay Raut | Shiv Sena

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:48 PM2022-01-24T14:48:54+5:302022-01-24T14:49:15+5:30

Sanjay Raut : Shiv Sena शिवसेनेला आपली प्रादेशिक पक्ष ही ओळख पुसायचीय. राज्याबाहेर लढूनही शिवसेनेला यश येत नाहीये. म्हणजे डिपॉझिट जप्त होतंय पण पक्षही वाढत नाहीये. लक्षात राहिल अशी कामगिरीही सेना करु शकत नाहीये. आता राज्याबाहेरचा आपला अय़शस्वी निकालांचा रेकॉर्ड तोडण्यासाठीच शिवसेनेनं हुकमी एक्का बाहेर काढलाय. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे स्वत मैदानात उतरणार आहेत. स्वत: आदित्य ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. योगी-अखिलेश-प्रियांकाविरोधात आता आदित्य यांच्यारुपानं आणखी एक स्टार चेहरा निवडणूक प्रचारात दिसेल. आदित्य प्रचार करतील, सभा घेतील अशी खुद्द संजय राऊत यांनी ही घोषणा केलीय. उद्धव ठाकरे आजारी आहेत, प्रवास करु शकणार नाहीत त्यातच मुख्यमंत्रीपदाची मोठी जबाबादारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकासंह इतर निवडणुकांचं नेतृत्व आदित्य करणार होते पण आता गोवा आणि उत्तरप्रदेशच्या निवडणुकीपासूनच आदित्य प्रचारात उतरतील. आदित्य प्रचारात उतरल्यानं शिवसेनेला कितपत फायदा होईल, आदित्य शिवसेनेचं डिपॉझिट वाचवू शकतील का, शिवसेना गोव्यात खातं उघडू शकेल का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण त्याआधी पाहुयात संजय राऊत नेमकं काय म्हणालेत ते..