चीनच्या कुरापतींना भारत ब्रह्मोसने उत्तर देणार India planning to deploy BrahMos missile at China?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:13 PM2021-11-17T15:13:31+5:302021-11-17T15:14:08+5:30
चीनने अरुणाचलमध्ये सीमेवर शंभर घरांचे गाव वसविल्याचं बोललं जातंय. सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आता सीमेवर सर्वात खतरनाक ब्रह्मोस मिसाइल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चीनच्या वाढत्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं आता आक्रमक पवित्रा घेतलाय. भारताच्या या निर्णयानं चीनला देखील चांगलीच मिरची झोंबल्याचं पाहायला मिळतंय. कारण चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतानं अशापद्धतीचा निर्णय घेणं हे सीमा वाद शांतीपूर्ण मार्गानं सोडवण्याच्या उद्देशात अडचण निर्माण करणारं ठरू शकतं, असं चीननं म्हटलं आहे. तसंच भारताच्या या निर्णयामुळे चीनसोबतच्या तणावात भर टाकण्याचं काम शेजारील देशानं केल्याचंही म्हटलं आहे.