Next

संस्था-उद्योग पळवले आता रिलायन्ससाठी महाराष्ट्राचे हत्तीही गुजरात पळवणार ! Modi Maharashtra Elephant

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 14:44 IST2022-01-14T14:44:27+5:302022-01-14T14:44:57+5:30

Gadchirolikars oppose taking 13 elephants from Maharashtra to Gujarat यापूर्वी अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्था किंवा उद्योग महाराष्ट्राबाहेर नेल्याचा आरोप मोदी सरकारवर झालाय, विशेषत महत्त्वाच्या सरकारी संस्था या महाराष्ट्रातून दिल्ली किंवा महाराष्ट्रातून गुजरातला पळवल्याचा आरोप करण्यात येतो. पण आता तर चक्क महाराष्ट्राचे हत्तीच गुजरात पळवणार आहे. महाराष्ट्रातून गुजरातला हत्ती नेण्याची प्रक्रियाही सुरु झालीय. बरं हे हत्ती गुजरातला का नेण्यात येणार आहेत तर चक्क रिलायन्ससाठी या हत्तींना महाराष्ट्रातून गुजरातला नेण्यात येणार आहे. नेमका काय प्रकार आहे हा, रिलायन्सला महाराष्ट्राचे हत्ती का हवेत, यापूर्वी कोणत्या संस्था, उद्योग राज्याबाहेर नेण्यात आलेत यावरच बोलुयात पुढच्या ३ मिनिटात पण त्याआधी पाहुयात महाराष्ट्रातून हत्ती गुजरातला नेण्याची प्रक्रिया का सुरु झालीय ते...