पवारांचा अपमान, राष्ट्रवादीला दिलेली एकमेव जागाही सपानं काढून घेतली? Akhilesh Yadav | Sharad Pawar
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:40 IST2022-01-19T17:39:44+5:302022-01-19T17:40:14+5:30
#upelection2022 उत्तरप्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतोय. समाजवादी पक्षाशी युती केल्याचं शरद पवारांनी स्वत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यानुसार राष्ट्रवादीला प्राथमिक चर्चेनंतर एक जागाही अखिलेश यादव यांनी दिली होती. पण आता हीच जागा काढून घेण्यात आल्याचं बोललं जातंय. पण असं काय झालं की पवारांना दिलेली एकमेव जागा अखिलेश यादव यांनी काढून घेतलीय, फक्त एकाच जागेवर लढण्यासाठी शरद पवारांनी समाजवादी पक्षाशी आघाडी का केली? एकच जागा दिली आणि तीही काढून घेतली हा शरद पवारांचा अपमान नाही का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात शरद पवारांच्या राष्ट्रवादी समाजवादी पक्षानं कोणती जागा देऊ केली होती ते...