Next

ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नावर जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण | Jitendra Awhad Daughter Wedding

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:31 PM2021-12-21T14:31:27+5:302021-12-21T14:31:48+5:30

Jitendra Awhad Daughter Natasha Christian wedding in Goa : मुंब्र्याचे आमदार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा रजिस्टर पद्धतीने विवाह पार पडला होता... अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या विवाहाचा राज्यभरात चर्चा झाली.. अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाडांनी दाखवलेल्या या साधेपणाचं कौतुकही झालं. जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशाने एलन पटेल यांच्याशी लग्नगाठ बांधली.. त्यानंतर आता गोव्यामध्ये पारंपारिक ख्रिश्चन पद्धतीनेही नताशा आणि एलन यांचा सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याचीही जोरदार चर्चा रंगतेय.. या कार्यक्रमाचे व्हिडीओ आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट केलेत. तसेच “आता माझी चिमुकली नताशा एलन पटेल झालीय,” असं कॅप्शन देत आव्हाडांनी व्हिडीओ ट्विट केलाय. त्यावरुन आता लोकांमध्ये चर्चा रंगलीय की, रजिस्टर लग्नानंतर पुन्हा ख्रिश्चन पद्धतीचा विवाह का?