८ जूनची रात्र, काळी कार... दिशाची आई का रडली? Nitesh Rane Narayan Rane | Disha Salian Parents
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:07 PM2022-02-22T21:07:06+5:302022-02-22T21:07:32+5:30
भाजप नेते नितेश राणे यांनी मंगळवारी सकाळी काही ट्विट्स केले आणि एकच खळबळ उडाली. दिशाला ८ जून २०२० च्या रात्री ब्लॅक रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आलं होतं. सचिन वाझेच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? वाझेला पोलीस दलात ९ जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आलं होतं. कनेक्शन?” आठ तारखेच्या रात्री उपस्थित असलेला आणि दिशासोबत राहणारा रोहन राय सर्वांसमोर येऊन मोकळेपणाने का बोलत नाही? असे अनेक प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केले... दिशा सालियानने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचं राणेंकडून वारंवार सांगितलं जातं. तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली.. असे आरोप राणेंनी याआधी केले होतं.. या सर्व गोष्टींनंतर दिशाच्या आई-वडिलांनी अखेर पत्रकारांसमोर आपली व्यथा मांडली.. महिला आयोगाकडे पत्र देत दिशाची आई आम्हाला जगू द्या, त्रास देऊ नका.. असंच सांगत होत्या.. यावेळी त्या आईच्या डोळ्यात पाणी आणि मनात दुःखही होतं...