कोर्टानं तंबी देताच कंगना हजर...म्हणाली कोर्टावर विश्वास नाही | Kangana Ranaut Javed Akhtar Case
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 09:14 AM2021-09-22T09:14:33+5:302021-09-22T09:15:13+5:30
कंगनाने अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॅालिवूडमधील सुसाईड गँगमध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असा आरोप कंगनानं जाहीर मुलाखतीत केला होता. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला आणि कंगनावर खटला भरला.. कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत होते. पण ती त्याला उत्तर देत नव्हती. कंगना एकदाही न्यायालयात सुनावणीला हजर राहिलेली नव्हती. मागच्या सुनावणीवेळी कंगनाच्या वकिलांनी ती देशात नसल्याने सुनावणीला येणार नाही. त्यामुळं इथे उपस्थित राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी केली होती.