करुणा शर्मांच्या अडचणी वाढल्या? Karuna Sharma Judicial Custody For 14 day | Dhananjay Munde Case
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:02 AM2021-09-15T10:02:41+5:302021-09-15T10:04:24+5:30
करुणा शर्मा सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. परळीत येऊन धनंजय मुंडेंबद्दल मोठे खुलासे करणार असं म्हणणाऱ्या करुणा शर्मा यांची पत्रकार परिषद होण्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र, या प्रकरणाच्या न्यायाधीश रजेवर असल्याने शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शनिवार १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आज त्यांना जामीन मिळणार अशी अपेक्षा असताना आणखी चार दिवस त्यांना वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना अडचणीत आणखी वाढ झालीय. असंच म्हणावं लागेल.