कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या काकड सोहळ्याची प्रथा फार वर्षापासून सुरू आहे. बलिप्रतिपदा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा सोहळा असतो. प्रज्वलित झालेला काकड जामिनीपासून १०० ते १२० फूटांवर मंदिराच्या शिखरावर कोणताही आधार न घेता कळसावरती ठेवला जातो.