मुंबईच्या आर्ट रिव्होल्युशनतर्फे ‘द अनडिफिटेड सेकंड किंग ऑफ स्वराज्य.. संभाजी महाराज’ या नावाने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलची आक्षेपार्ह चित्रे लावण्यात आली होती. याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या छत्रपती संभाजीराजेप्रेमींनी रविवारी रात्री प्रदर्शन बंद पाडत त्यातील आक्षेपार्ह सात चित्रे ताब्यात घेतली. आक्षेपार्ह चित्राबद्दल संयोजिका स्मृती शिरसाट यांनी माफी मागितली.