प्रजासत्ताक दिनाच्या आधी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा व औरंगाबादमधून ९ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांनी ‘इसिस’कडून प्रशिक्षण घेतल्याचा संशय आहे. पॉप्युलर फ्रंट ही संस्था देशविघातक असल्याचे समजते.