मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं ' महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.