Maharashtra Election 2019 : 10 रुपयात थाळी येत नाही - गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 09:02 AM2019-10-17T09:02:14+5:302019-10-17T09:07:48+5:30
दहा रुपयात जेवण आणि एक रुपयात आरोग्य तपासणी ही शिवसेनेची योजना आमच्याशी चर्चा करुन केली असती तर ती व्यापक ...
दहा रुपयात जेवण आणि एक रुपयात आरोग्य तपासणी ही शिवसेनेची योजना आमच्याशी चर्चा करुन केली असती तर ती व्यापक स्वरुपात भाजपने देखील आपल्या जाहीरनाम्यात मांडली असती. मात्र, त्यांनी तसे विचारले नाही. अर्थात, ती त्यांची भूमिका आहे. त्यावर मी जास्त बोलणे योग्य नाही, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.