महाराष्ट्र राज्यात माहिती अधिकाराचा गळा घोटला जात असल्याचा आरोप देशाचे माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई मेल पाठवून हा आरोप केलाय. महाराष्ट्रात माहिती अधिकार आयुक्तांच्या पदांवर नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे माहिती अधिकाराखालील प्रलंबित प्रकरणांचा डोंगर साचू लागला आहे.