मुलायम सिंह यादवांची सून भाजपात, कारण काय? Mulayam Singh Yadav Daughter In Law | Aparna Yadav BJP
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:33 IST2022-01-20T14:32:44+5:302022-01-20T14:33:17+5:30
देशभरात मोठ्या राजकीय उलथापालथ सुरु आहेत... निवडणुका आल्या की नेहमीच बंडखोरी झालेली पहायला मिळते. तशी बंडाळी यावेळीही पहायला मिळाली आहे.. गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा उगारलाय. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंडात भाजपच्या अनेक मंत्र्यांनी भाजपला राम राम ठोकलाय. हे सर्व सुरु असताना भाजपने मोठा डाव टाकलाय.. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने भाजपचे मंत्री फोडले. आता भाजपने सपा नेते मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून व अखिलेश यादवांच्या वहिनींनाच पक्षात घेतलं..