नवाब मलिकांना अटक, पुढे काय? ED arrests Nawab Malik in money laundering case
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:27 PM2022-02-23T17:27:11+5:302022-02-23T17:44:37+5:30
ED arrests Nawab Malik in money laundering case linked to Dawood Ibrahim नवाब मलिक ईडीच्या जाळ्यात, नेमकं काय झालं? नवाब मलिक... राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते... गेल्या काही महिन्यांपासून नवाब मलिक चर्चेत आहेत आणि त्यांनी केलेल्या आरोपांनी राज्यभरात मोठी खळबळ उडतीय... रोज सकाळी न चुकता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी फडणवीस, सोमय्यांसारख्या भाजपच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवली... एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडेंवरून तर राज्यभरात वातावरण तापलं... अगदी वानखेडेंच्या जातीपासून ते त्यांच्या बारच्या परवान्यापर्यंत मलिकांनी पुरावे दाखवत आरोप केले... तेच नवाब मलिक आता ईडीच्या फेऱ्यात अडकलेयत... या प्रकरणात नवाब मलिकांना अटकही होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय... काय आहे नेमकं प्रकरण आणि मलिक ईडीच्या फेऱ्यात का अडकलेयत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...