Kiran Mane प्रकरणात नवा ट्विस्ट, सेटवरच्या कलाकारांमध्येच उभी फूट | पाहा काय घडलंय | Mulgi zali Ho
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:44 IST2022-01-17T14:43:56+5:302022-01-17T14:44:14+5:30
सध्या किरण माने प्रकरण गाजतंय, मालिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर किरण मानेंनी आरोपांची राळ उठवली होती. भाजपला विरोध करतो म्हणून कामावरुन काढून टाकलं असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर स्टार प्रवाहसह सेटवरच्या काही कलाकारांनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या वागणुकीसाठी त्यांना काढून टाकण्यात आलं होतं असा दावा स्टार प्रवाहानं केला तर किरण मानेंची वागणूक सेटवर चांगली नव्हती अशी तक्रार काही सहकलाकारांनी केली. आता या सगळ्या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलाय.