दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाईची दशाभूजा महाकाली रूपात पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 05:23 PM2017-09-22T17:23:57+5:302017-09-22T17:24:29+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या माळेला शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची दशभूजा महाकाली रुपात पूजा बांधण्यात आली. रात्री देवीची सुवर्णपालखी ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या माळेला शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची दशभूजा महाकाली रुपात पूजा बांधण्यात आली. रात्री देवीची सुवर्णपालखी काढण्यात आली. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी देवीचा अभिषेक केला. दुपारची आरती शंखतीर्थनंतर देवीची दशभूजा महाकाली रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी दुर्गासप्तशतीमधील प्रथम चित्राची नायिका असून, तिचा विष्णु आणि मधु-कैटभ कथेमध्ये अविर्भाव आहे.