Nitesh Rane lockupमध्ये चिंतन करतायंत, कोणतं पुस्तक वाचतायंत? Nitesh rane arrest | Maharashtra News
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:59 IST2022-02-03T15:59:19+5:302022-02-03T15:59:38+5:30
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे कणकवली कोर्टासमोर शरण आले, त्यानंतर त्यांची रवानगी लॉकअपमध्ये झाली. रात्री उशिरा त्यांना सावंतवाडी जेलमध्ये आणण्यात आलं. त्यातच नितेश राणेंचा लॉकअपमधला एक फोटो व्हायरल झालाय. नितेश राणे तुरुंगात असतानाही कशाप्रकारे मनन करतायत, एकाग्र पद्धतीनं चिंतन करतायंत असे स्टेटस नितेश राणे समर्थकांनी ठेवले तर याच फोटोवरुन शिवसैनिकांनी नितेश राणेंना ट्रोल करायला सुरुवात केली. त्यामुळे हा फोटो नेमका कधीचा आहे, आत्ताचा आहे की जुना आहे, मॉर्फ आहे का म्हणजे बनावट आहे का, अशा चर्चा सुरु झाल्या. तुरुंगात नितेश राणे पुस्तक वाचताना दिसतायत, त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसतेय. हा व्यक्ती म्हणजे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला करणारा सचिन सातपुते आहे का असाही प्रश्न विचारला गेला.