ना पूल ना रस्ता... आदिवासी बालिकेचा करुण अंत | Bori River Flood In Jalgaon | Maharashtra News
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 11:04 AM2021-09-08T11:04:34+5:302021-09-08T11:04:50+5:30
बोरी नदीला पूर आलेला...येण्या-जाण्यास रस्ता किंवा पूल नाही. १३ वर्षांची मुलगी तापानं फणफणत होती. अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारासाठी नदी काठावर आणले.. जेणेकरुन नदी ओलांडून जाता येईल आणि मुलीचा प्राण वाचेल. पण दुर्दैव. नदीकाठी या निष्पाप आदिवासी बालिकेचा मृत्यू झाला. उपचाराअभावी, पुलाअभावी, रस्त्याअभावी मुलीचा करुण अंत झाला. जळगावच्या अंमळनेर तालुक्यातल्या सात्री इथं ही दुर्दैवी घटना घडली. बोरी गावच्या आरुषी भिल या १३ वर्षीय आदिवासी बालिकेचा अंत झाला.