Next

विधान परिषदेची संधी पुन्हा डावलली; पंकजा मुंडे म्हणाल्या… Pankaja Munde | Chandrashekhar bawankule

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 04:22 PM2021-11-24T16:22:17+5:302021-11-24T16:23:04+5:30

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये अनेक वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर त्यांची नाराजी दिसून आली. बाजूला सारल्याची भावना या नेत्यांना होती. त्यानंतर या नेत्याचं पुनर्वसन कधी होणार यावर चर्चा रंगली होती. अखेर २०२१ मध्ये या नेत्यांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम पक्षाने हाती घेतलाय. असं म्हणावं लागेल. तिकीट नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिलीय तर विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्रिपदी वर्णी लागलीय. पंकजा मुंडेंनाही राष्ट्रीय सचिव म्हणून पुन्हा संधी देण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपमध्ये बऱ्याच हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्यावर पंकजा मुंडेंनीही प्रतिक्रिया दिलीय.