Pankaja Munde आणि चंद्रकांत पाटलांचं एकमत, तर फडणवीस अजूनही आशावादी? Devendra Fadnavis | Shivsena
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 03:29 PM2021-11-18T15:29:43+5:302021-11-18T15:29:59+5:30
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे तीन पक्षांचे सरकार पडणार कधी यांची तारिख भाजप नेत्यांकडून दिली जात होती. सरकार कधी पडणार याचा मुहूर्त भाजप नेते सांगत होते. पण वेळोवेळी मुहुर्तांची तारिख मात्र बदलत होती. एकप्रकारे तारिख पे तारिख हाच प्रकार भाजपकडून सुरु होता... हा मुहुर्त ठरवण्याच्या कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ नेतेही होते आणि आमदारही होते.. पण भाजप नेत्या Pankaja Munde यांनी मात्र वेळोवेळी आपल्याच पक्षातील नेत्यांचे कान टोचले. तुम्ही सरकार पडणार की नाही पडणार याच्यातून बाहेर येणार आहात की नाही? याबद्दल मी पक्षातील नेत्यांशी बोलणार आहे," अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. वेळोवेळी त्यांनी हीच भुमिका मांडल्याचं दिसून आलंय. आणि ती कायम ठेवली..