शाकाहारी विरुद्ध मांसाहारी, मुंबईत पुन्हा रंगली चर्चा PETA gives Mumbai vegan-friendly city award
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:30 PM2021-11-16T14:30:01+5:302021-11-16T14:30:31+5:30
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराला एक पुरस्कार मिळाला... तसं पुरस्कार मिळणं ही गोष्ट अभिमानास्पद असते. पण या पुरस्कारामुळे मुंबईत दोन गट पडलेत.. आणि यावरुन वाद सुरु झालाय. शाकाहारपूरक शहर म्हणून मुंबईला पुरस्कार मिळाला आणि यावरुन मांसाहारप्रेमी संतापले. पिटा इंडीयाने दिलेला हा पुरस्कार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी स्वीकारला आणि त्यावरुन राजकारणही सुरु झालंय..