पेट्रोल १२५ रुपये होणार? पण पेट्रोल-डिझेलचे दर सतत का वाढतायंत? | Petrol Diesel Price Hike in India
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 10:18 AM2021-10-02T10:18:22+5:302021-10-02T10:19:29+5:30
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालीय आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती जर अशाच वाढत राहिल्या तर या वर्षाच्या शेवटपर्यंत पेट्रोल १२५ रुपये लिटर होऊ शकतं तर डिझेल ११५ रुपये पर्यंत जाऊ शकतं असा अंदाज कच्च्या तेलाच्या दरांचं विश्लेषण करणाऱ्या गोल्डमॅन सॅश या कंपनीनं दिलाय.. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल महागलं म्हणून पेट्रोल महागलं असं सांगितलं जातं पण कच्च तेल का महागतं.. या कंपनीनं जी आकडेवारी दिलीय ती काय सांगते हे आपल्याला पाहचंय पुढच्या फक्त ३ मिनिटात त्यामुळे रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा. नमस्कार मी अनिकेत तुम्ही लोकमत पाहताय.