महाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:11 PM2021-01-30T17:11:33+5:302021-01-30T17:12:02+5:30
थंडीत थंडीच्या ठिकाणी फिरणं म्हणजे वेगळीच मज्जा असते... त्यात जर तुमच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये महाबळेश्वर असेल तर कमालच! महाबळेश्वर हे सातारा जिल्हातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रातील उत्कृष्ट गिरीस्थान असलेले हे ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोल अशा तीन खेडेगावांनी महाबळेश्वर शहर निर्माण झाले आहे. हे निसर्गरम्य ठिकाणी पठार आणि खोल द-यांनी वेढलेलं आहे. कृष्णा,कोयना,वेण्णा,सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. क्षेत्र महाबळेश्वर,वेण्णा लेक,विविध पोइंत,बाजारपेठ,पाचगणी, प्रतापगड,तापोळा अशी प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. अजून कोण कोणते ठिकाण आहेत जे महाबळेश्वर मध्ये फिरण्यासारखी आहेत पाहुयात...