Next

आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी पॉझिटिव्ह | Passenger from Africa found positive in Dombivli

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 15:20 IST2021-11-29T15:20:12+5:302021-11-29T15:20:38+5:30

ओमिक्रॉन विषाणूचा जगभरात झपाट्याने प्रसार होतोय, दक्षिण आफ्रिकन ओमिक्रॉन स्ट्रेन धुमाकूळ घालतोय. आफ्रिकन देशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले जातायंत , त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत दाखल झालेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे यंत्रणा हायअलर्टवर गेल्यात, आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या ३२ वर्षीय प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्यानं त्याला उपचारासाठी कल्याणच्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. पण धक्कादायक म्हणजे या व्यक्तीनं माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यानं खळबळ माजलीय. संबंधित प्रवाशी 24 नोव्हेंबरला डोंबिवलीत दाखल झाला.