Pulwama Terror Attack : पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 13:51 IST2019-02-15T13:51:23+5:302019-02-15T13:51:47+5:30
पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत ठाण्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबईतील ...
पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत ठाण्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबईतील वाशी येथील शिवाजी चौकात शिवसेनेने पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने करून पाकिस्तानचा झेंडा जाळला आहे. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला.