नोकरी सोडली, व्यवसाय केला अन् 'ही' महिला अब्जाधीश बनली |Falguni Nayar India's wealthiest billionaire
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:53 PM2021-11-12T14:53:53+5:302021-11-12T14:54:20+5:30
लाखो रुपये पगाराची नोकरी सोडली. वयाच्या पन्नाशीत स्वत:चा बिझनेस सुरु केला आणि आज ही महिला जगातल्या श्रीमंतांच्या यादीत आलीय. स्वतच्या हिंमतीवर अब्जाधीश होणारी ही भारतातली पहिलीच महिला ठरलीय.. बिझनेस स्टार्ट केला आणि अब्जाधीश झाली असं काही या महिलेच्याबाबतीत झालं नाही तर आधी १९ वर्ष नोकरी केली, त्या अनुभवाच्या जोरावर व्यवसाय सुरु केला, ८ वर्ष व्यवसायात धक्के खाल्ले आणि मग आज ही महिला अब्जाधीश झाली.