यवतमाळ - म्यानमारमध्ये मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ल्याचा आणि सामुहिक हत्येचा निषेध करण्यासाठी यवतमाळात मुस्लिम समाजाच्यावतीने जिल्हा कचेरीवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांनी म्यानमारच्या या अमानवीय कृतीचा निषेध नोंदवून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.