आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने शनिवारी (13 एप्रिल) शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राममंदिरांमध्ये रामजन्मोत्सव, मिरवणूक, कीर्तन, प्रवचन यांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस असून, या तिथीस भगवान रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी शहरातील विविध मंदिरांमध्ये रामजन्माचा सोहळा होतो.