रमेश कराड यांना भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आणण्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे या माध्यमातून धनंजय यांनी पंकजा मुंडे आणि पर्यायाने भाजपावर कुरघोडी केल्याची चर्चा होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांत पडद्यामागे झालेल्या वेगवान राजकीय हालचालींनंतर रमेश कराड यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.