Next

राणेंनी एका दगडात सेनेला दोनदा डिवचलं, पण कसं? Shiv Sena Manish Dalvi | Narayan Rane

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:29 PM2022-01-14T14:29:43+5:302022-01-14T14:30:00+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची यावेळची निवडणूक प्रचंड चर्चेची झालीय. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राणेंविरोधात प्रचाराचा जोर लावला होता. कसंही करून राणेंचा आणि भाजपचा पराभव करण्यासाठी कंबर कसली होती. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरही दिग्गज नेते सिंधुदुर्गात मुक्काम ठोकून होते. मात्र नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड देत ११-८ असा दणदणीत विजय मिळवला. आणि भाजपचा झेंडा जिल्हा बँकेवर लावला. या सगळ्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाला. तो विषयही ठाकरे सरकारने गांभीर्याने घेत पोलिस स्टेशन आणि कोर्टापर्यंत धाव घेतली. याच हल्ल्याप्रकरणी नितेश राणे अजूनही फरार आहेत. कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झालीय. ते अजूनही समोर आलेले नाहीत. याच पार्श्नभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडलीय. त्यात राणे यांचे कट्टर समर्थक असलेल्या भाजपच्या मनीष दळवी यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भाजपच्या अतुल काळसेकर यांची निवड झालीय. यातील मनीष दळवी हे संतोष परब हल्ला प्रकरणात आरोपीही आहेत. पाहूयात मनीष दळवी कोण आहेत..