ठाकरेंऐवजी राऊतच चेहरा, राऊतांची शिवसेनेत लार्जर दॅन लाईफ इमेज का बनलीय? Sanjay Raut Vs Thackeray
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 09:22 PM2022-02-17T21:22:12+5:302022-02-17T21:22:36+5:30
शिवसेना सत्तेत असोत वा बाहेर, ठाकरेंचा शब्दच शिवसेनेत शेवटचा असतो. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा रिमोट कंट्रोल माझ्याच हातात आहे असं बाळासाहेब त्यांच्यासमोरच सांगायचे. बाळासाहेब सक्रिय राजकारणातून दूर झाले, उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष आणि मग पक्षप्रमुख झाले तेव्हापासून अंतिम शब्द हा ठाकरेंचाच म्हणजे उद्धव ठाकरेंचाच मानला जातो. पण आता हे समीकरण बदलत चाललंय का, असा प्रश्न विचारावासा वाटतो. हा म्हणजे तसं उघडपणे कुणी बोलणार नाही, बोलत नाहीये पण ज्या पद्धतीनं संजय राऊत लढतायत ते पाहता तेच शिवसेनेचा चेहरा बनतायत का, शिवसेनेतल्या सत्तेचा केंद्रबिंदू हा राऊतांच्या बाजूनं झुकतोया का, राऊतच शिवसेनेत नवे सत्ताकेंद्र बनतायत का अशी कुजबूज मात्र नक्की सुरु झालीय...