विजय शिंदेआकोट(जि.आकोला), दि. 30 : संत नरसिंग महाराज यांचे जन्मगाव म्हणजे आकोट तालुक्यातील जळगाव नहाटे.ज्या गावात कधीकाळी लोणी,दही,दुधाची आयात ना नफा ना तोटा तत्वावर कधीकाळी होत होती. या लोणी बाजारपेठेचे माध्यमातुनच संत नरसिग महाराज नहाटे व उमराचे मियॉसाहेब या गुरू- शिष्याच नांत जुळले.या नात्यांन हिदु- मुस्लीम ऐक्याची शिकवण दीली.त्याच जळगाव नहाटे येथील जिल्हा परिषद शाळामध्ये विद्यार्थीनी ना नफा ना तोटा या तत्वावर शालेय साहीत्याचे विद्यार्थी सहायता नावाच 'आमंच दुकान'थाटले आहे.जीएसटी प्रणालीचे काळात हे दुकान विद्यार्थीना स्वंयम संचालीत व्यवहाराचे धडे देणारी ज्ञानरचनावादी उपक्रम देणारी शाळा ठरत आहे.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अनेक अडचणी असतात. त्यापैकी त्यांना दररोज लागणा-या लेखन साहित्याचा अभाव हे एक अडचण. विद्यार्थी अभ्यास करतेवेऴी त्याला अभ्यासपुरक आवश्यक साहीत्य वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे असते. ते जर वेळेवर मिळाले नाही,तर त्याचा संपूर्ण दिवस वाया जावून तो विद्यार्थी त्या अभ्यासात मागे पडतो. अशा स्थिती विद्यार्थ्यांना व्यवहाराचे प्रात्याक्षिकातून कौशल्य अवगत व्हावे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार,भागाकार संबोध स्पष्ट व्हावा.नोटा व नाणी यांची ओळख व्हावी. रास्तदरात मुलांना साहित्य उपलब्ध व्हावे. खाऊचे पैसे गोळा करून विदयार्थी साहित्य घेतात.बचतिची सवय व्हावी. या करीता आकोट पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची वर्गणी तथा लोकवर्गणितून निधी उभारला. या निधीमधुन वर्ग चौथीच्या विद्यार्थानी शाळेतच आमच दुकान सुरू केल. दुकानाचे सर्व संचलन विद्यार्थ्यां करतात. दुकानात विद्यार्थीच मालक ग्राहक आहेत. दुकानात पेन ,पेन्सिल ,स्केल, कंपासबॉक्स, वह्या (एक दोन तीन रेघी) रजिस्टर, ड्रॉइंग बूक, बाललिपी, इंग्रजी वाचन पुस्तके, सेंच्यूरी पेपर, क्रेयॉन्स, कलर पेन्सिल, आलेखवही इतर साहित्य विक्रीकरीता ठेवले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर या साहित्याची विक्री करण्यात येते.या उपक्रमाकरीता मुख्याध्यापिका दिपा थोरात , रवींद्र कापसे , वर्गशिक्षका संध्या पांडे, आनंद नांदुरकर , पांडुरंग पवार, रूपाली इंगळे व अजय अरबट यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या आकोला जिल्ह्यात विशेषतः आकोट तालुक्यात डिलीटल शाळा व कॉन्व्हेच्या भाऊगर्दीत व्यवहाराचे धडे देणारे 'आमंच दुकान'या आगळ्या वेगळ्या उपक्रम प्रेरणादायी ठरत आहेत.