Next

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात महिलेने दिला सायामी जुळ्यांना जन्म

By अझहर शेख | Published: June 10, 2019 07:29 PM2019-06-10T19:29:40+5:302019-06-10T19:30:10+5:30

नाशिक - नाशिकमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज एक आदिवासी महिलेने चक्क  'सयामी' जुळ्यांना जन्म दिला. ही महिला रविवारी रात्री ...

नाशिक - नाशिकमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज एक आदिवासी महिलेने चक्क  'सयामी' जुळ्यांना जन्म दिला. ही महिला रविवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. यापूर्वी सोनोग्राफी न केल्याने त्यांना त्याबाबत तशी कल्पना न्हवती.  सोनोग्राफी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागातील तज्ज्ञांनी अवघड व आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली. या द्वारे महिलेची प्रसूती झाली. लाखोंच्या मागे अशी एखादी दुर्मीळ घटना घडते असे डॉक्टरांनी सांगितले. मातेची प्रकृती उत्तम आहे. या बाळांना पुढील शस्त्रक्रियेसाठी मुंबईत जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाने यांनी सांगितले. ही प्रसूती दिवसभर रुग्णालयात चर्चेचा विषय ठरली. (व्हिडीओ - अझहर शेख) 

टॅग्स :नाशिकNashik