मुस्लिम समाजातील लोकांचे कोरोना लशीबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी Salman Khan करणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 03:16 PM2021-11-18T15:16:42+5:302021-11-18T15:17:05+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं जातं असून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन सरकारकडून करण्यात येते.. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने दहा कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.. मात्र असं असलं तरीही गैरसमजुतीमुळे अनेकांनी लस घेतली नाही.. त्यामुळे या लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी ठाकरे सरकारने एक नवी रणनीती आखली आहे.. लसीकरणाचा प्रमाण वाढवण्यासाठी ठाकरे सरकार आता अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहेत..