Next

'या' तारखेपासून संभाजीराजे आमरण उपोषण करणार Chhatrapati Sambhaji Raje on hunger strike | Reservation

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:41 PM2022-02-14T22:41:18+5:302022-02-14T22:43:19+5:30

५ मे २०२१ ला मराठा आरक्षण रद्द झालं, तेव्हापासून मराठा आरक्षणासमोरचा कायदेशीर पेच काही सुटत नाहीये. कोरोनामुळे मराठा आंदोलन थोड्याकाळासाठी थांबवण्यात आलं होतं पण आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी एल्गार पुकारलाय. आरक्षणासाठी राजे स्वत: आमरण उपोषणाला बसतायत. मी उद्विग्न झालोय, त्यामुळे टोकाची भूमिका घेतोय असं संभाजीराजे म्हणतायंत. त्यांनी आता आमरण उपोषणाची तारीखच जाहीर केलीय. काय म्हणतायत संभाजीराजे पाहुयात..