Next

'या' शाळकरी मुलीने मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन Dnyaneshwari Shete letter to Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:35 IST2022-01-17T14:35:09+5:302022-01-17T14:35:23+5:30

कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रांचं चक्र जिथल्या तिथं थांबलंय... त्यातून शाळाही वाचलेल्या नाहीत... खरंतर शाळेत जाणं प्रत्येकाला नको वाटतं... पण, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मुलांना शाळेचं तोंड पाहता आलेलं नाहीय. त्यामुळे अने मुलांना शाळेची ओढ लागलीय. पहिली लाट गेली, दुसरीही गेली... त्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या... पण आता तिसऱ्या लाटेत पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ आलीय... हे ऐकून ज्ञानेश्वरी शेटे या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक व्हिडीओ केलाय... तो प्रचंड व्हायरल होतोय... पाहूयात ज्ञानेश्वरी काय म्हणतेय..