Next

जिच्या बापाची भूमिका साकारली तिनेही गंभीर आरोप केले | 'Mulgi Zali Ho' Actors on Kiran Mane

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:34 IST2022-01-17T14:33:59+5:302022-01-17T14:34:18+5:30

मुलगी झाली हो ही स्टार प्रवाहवरील मराठी मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. किरण माने यांना या मालिकेतून काढल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकलं गेल्याचा आरोप आधी करण्यात येत होता. त्यानंतर काही व्यावसायिक कारणांमुळे किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याचा दावा मालिकेच्या निर्मात्यांनी केला. या गावात सुरु असलेल्या शूटिंगही बंद पाडण्याबाबतचं एक पत्र व्हायरल झालं होतं. त्यानंतर एकूण या संपूर्ण प्रकरणी मुलगी झाली हो, मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी किरण माने यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे... टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे... किरण माने यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांच्या सहकलाकार नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊ...