शिवसेना उमेदवाराने घेतला मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर आक्षेप Uddhav Thackeray Goa Election | Shiv Sena
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 02:54 PM2022-01-31T14:54:34+5:302022-01-31T14:54:53+5:30
महाराष्ट्राबाहेर शिवसेना काही किमया करुन दाखवते का? याकडे महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचं लक्ष लागलंय.. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा फायदा म्हणजे भाजपचं नुकसान हे साधं गणित असल्याचं अनेकजण सांगतात.. त्यामुळे शिवसेनेकडून गोवा आणि उत्तर प्रदेशात जोरदार ताकद लावलीय. उत्तर प्रदेशात मात्र शिवसेनेच्या सात उमेदवारांचे अर्ज बाद झाले. कुणाला तरी आमची भीती वाटतेय. आमचे अर्ज रद्द करण्यात आले. असं त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेने अत्यंत सावध पावलं उचलत गोव्यात नवी रणनिती आखली. अर्ज बाद होणार नाही, याची काळजी गोव्यात शिवसेनेने घेतलीय...