उत्तर प्रदेशात शिवसेना मोठा डाव टाकणार ? Uddhav Thackeray Narendra Modi | Shiv Sena Uttar Pradesh
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:40 PM2022-01-14T14:40:30+5:302022-01-14T14:41:09+5:30
भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी शिवसेना मैदानात उतरलीय.. आता या ५० ते १०० जागा कोणत्या असतील त्यावरुन चर्चा सुरु झालीय. संजय राऊतांच्या बोलण्यातून हेच समोर येतं की, शिवसेना उत्तर प्रदेशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल आणि त्यांना भाजपला सत्तेबाहेर काढायचंय.. त्यामुळे भाजपला नुकसान होईल अशा ठिकाणीच शिवसेनेकडून उमेदवार उभे केले जातील, अशी शक्यता वर्तवली जातेय. ज्याचा थेट फायदा हा भाजप विरोधकांना तिथे होऊ शकतो. उत्तर प्रदेशात शिवसेनेची रणनिती काय आहे.. यावर बोलताना संजय राऊत काय म्हणाले पाहा...