"गिरीश महाजन दाखवा, 10 लाख मिळवा" | Girish Mahajan | Jamner | Corona Virus in Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 23:38 IST2021-04-25T23:38:13+5:302021-04-25T23:38:40+5:30
जेव्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा गिरिश महाजन हे नाव चर्चेत होतं. फडणवीस सरकारवर कोणतंही संकट आलं तर गिरिश महाजन हे संकटमोचक म्हणून समोर यायचे. आरोग्यदूत म्हणून त्यांची ओळख झाली होती. अनेक आरोग्य शिबीरं त्यांनी राज्यात घेतली. पण ऐन कोरोना काळात ते आपल्या जामनेर मतदारसंघातून गायब झालेत. ते पश्चिन बंगालमध्ये सध्या प्रचारात गुंतलेत. त्यावरुन राष्ट्रवादीच्या जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनाची चर्चा होतेय. कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात आमदार आपापल्या कार्यक्षेत्रात कामकाज करीत आहेत. अशावेळी गिरीश महाजन यांची तालुक्याला गरज असताना येथे दिसत नाही. आरोग्यदूत आमदार दाखवा आणि १० लाख मिळवा, अशी टीका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली..