Sonali Kulkarni reply to the troller who trolled him for Karvachauth सोनालीचे ट्रोलरला सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:43 PM2021-10-26T15:43:03+5:302021-10-26T15:44:34+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने लग्नानंतरची तिची पहिली करवाचौथ नुकतीच साजरी केली...त्यासाठी तीने थेट दुबई गाठली. याचनिमित्ताने सोनालीने पोस्ट केली होती की, दोन महिन्यांनंतर नवरोबाला भेटणार. भेटण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.जरी आम्ही उपवास ठेवला नाही किंवा उत्सव साजरा केला नाही, परंतु या करवाचौतला एकत्र राहण्याची आशा आहे.मी मुंबईहून दुबईत पोहचलीये, नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल.याची खात्री आहे. तिच्या या पोस्टवर कोरिओग्राफर फुलवा खामकरसह तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.पण याचकारणामुळे ती ट्रोल देखील झाली आहे. आपली संस्कृती विसरुन इमेज खराब करुन घेवू नका. पैसा बोलता है फक्त, आपल्या संस्कृतीत करवाचौथ आपण करत नाही अशा शब्दांत तिला ट्रोल करण्यात आलंय..