Next

पायऱ्यावर पतीने तिच्या डोळ्यासमोर साथ सोडली | Corona Virus In Maharashtra | Chandwad | Nashik

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:16 AM2021-04-24T08:16:47+5:302021-04-24T08:17:34+5:30

आयुष्याचा साथीदार आपल्या डोळ्यासमोर साथ सोडत असताना पत्नीचा हा टाहो काळीज पिळवटून टाकतो. आपल्या पतीला त्रास होत असल्याने पत्नी त्याला रुग्णालयात घेऊन आली. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाबाहेर येऊन तपासलं. अरुण माळी यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी झाले होते. त्यानंतर बेडची व्यवस्था करेपर्यंत आणि उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितलं. मन सुन्न करणारी ही धक्कादायक घटना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडलीय. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जातेय..