सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी नवेट गावातील सहदेव एरीम यांच्या मंडपात सर्व धर्मियातील बंधू-भगिनींची गर्दी केली होती. हा विवाह विशेष होता. कारण दोन दिव्यांगांची मने जुळून आली होती अन् मैत्रीचं रुपांतर लग्नबंधनात झाले होते. या आनंद सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुवर्णा व योगेश या दोन दिव्यांग उभयतांचं हे लग्न पाहण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी गर्दी केली होती.